Sunday, February 18, 2007

कुणी तरी!

कधी कधी वाटतं करुन दाखवावं काही तरी,
सारखेपणाच्या दुनियेत बनावं वेगळं कुणी तरी!

कधी कधी वाटतं मी म्हणजे फ़ार हुशार!
प्रत्येक परिक्षेत नाही का मार्क मिळालेत फ़ार?
मार्कांचा जोर तरी कुठवर म्हणा चालणार!
प्रत्यक्ष मैदानावर लढणार, तोच नाही का श्रेष्ठ ठरणार?

कधी कधी वाटतं मग मी का नाही लढावं?
'Executive Club' मध्ये आपणही का नाही शामिल व्हावं?
आतून आवाज येतो, 'बाळा, त्यासाठी मन घट्ट हवं,
कितीही वादळं आली, तरी सोसायचं बळ हवं'!

कधी कधी वाटतं, कशाला डोक्याला ताप तरी?
चाललय व्यवस्थित, तर कर की मजा थोडी तरी!
असं वाटता वाटता वाटतं, सालं बस्स झालं,
अत्ता नाही केलं तर... कोण जाणे, होणारही नाही नंतर कधी!

कधी कधी वाटतं, अशा एखद्या क्षणीच होणार आहे सुरुवात खरी.
कधी कधी वाटतं, नक्कीच होऊन दाखवीन कोणी तरी!!